Skip to main content

Posts

ICU (आय. सी. यु)

(आयुष्याचा खरा अर्थ समजावून सांगणाऱ्या अनुभवामधून जन्मलेली कविता…) छताकडे डोळे लावून आतमध्ये थरथरत होता 'तो'... टिकटिक संपण्याची वाट बघत घंटेकडे डोळे लावून मंदिराबाहेर थिजली होती 'ती'... कौल येण्याची वाट बघत घड्याळाकडे डोळे लावून दरवाज्याबाहेर बसला होता 'चित्रगुप्त'... ड्युटी संपण्याची वाट बघत बसून राहिली तशीच रेंगाळत न सरकता 'वेळ'... पाट फुटण्याची वाट बघत मारत राहिले लाथा अथक चिवट खेळात 'चौघेही' 'दुसरे' थकण्याची वाट बघत!  बब्बू

पोशिंदा

आला वैशाख वणवा तरी चैत नाही आला लई तापली जमीन तळ आत्ताच गाठला माझा शेतकरी बाप केलं नाही त्यानी पाप पाणी नाही जमिनीला धार लागली डोळ्याला परी आभाळ फाटलं तरी आभाळ फुटंना पुरे झाली आता थट्टा कौल लावला देवाला अरे विठ्ठला विठ्ठला दाव थोडी दया माया गुरं सैराट सोडूनी येऊ कसा भेटायाला? घोषणांचा नाय तंटा मदतीचा तोरा मोठा माझा छोटा साभिमान इकू का रं सावकारा? नको नको भगवंता उपकार नको आता तुझ्या गाभाऱ्यात उभा उभ्या जगाचा पोशिंदा !  बब्बू पुणे २ एप्रिल २०१६

प्रतीक

गेल्या काही महिन्यांपासून आजूबाजूच्या घटना आणि सामान्य समाजाचे वर्तन पाहून मनात येणाऱ्या अस्फुट विचारांना आज कवितेची वाट मिळाली..माझी बहुतेक पहिलीच कविता! प्रतीक काही बोलायचे आहे पण बोलणार नाही समशेर उपसली होती पण मारणार नाही आसवे डोळ्यामधली मी गाळणार नाही मित्राच्या खांद्यावरती मस्तक टेकणार नाही मी नाही विकल, नाही मी अस्वस्थ निष्क्रिय मी केवळ, गर्दीचे प्रतीक फुकाची ती वाफ, तरल तो आक्रोश विरून ही जातो, झुंडीत मी पोटाच्या दाण्यांसाठी, दृष्टी आड सृष्टी सत्य नेमके काय, याचा ठाव नाही वेडा की रे तो, जो नाचतो बेभान विसावणार तो ही, चार निमिशांत मग कशा हवी फुकाची, ती धावपळ निष्क्रियता माझी, स्वप्निल थोर आहे! बब्बू पुणे 12 मार्च 16

कुणी घर देईल का घर?

वेळ रात्री 1 ची. 'नटसम्राट' बघून सुन्न डोक्याने 'मंगला' मधून बाहेर पडलो. चांगलीच थंडी होती. 'To be or not to be' म्हणत स्वतःच्या अस्तित्वाबद्दलच प्रश्न विचारणारा नटसम्राट, स्वतःच्या कर्तृत्वावर कमावलेल्या माजावर काळाने केलेली मात पाहून उध्वस्त झालेला नटसम्राट, प्रचंड प्रेम केलेल्या पोटच्या पोरांकडून अपमानित झालेला रंगभूमीचा दुभंगलेला नटसम्राट! कधी मुजोर, कधी हळवा, कधी निखळ, कधी लाचार भासणाऱ्या नटसम्राटाने डोक्यात वादळ उभं केलं होतं. त्याच अवस्थेत बाईक सुरु केली आणि बाहेर पडलो. महापालिकेसमोरच्या मुख्य रस्त्याला लागेपर्यंत थंडीने शरीराचा ताबा घेतला होता. नटसम्राटाची शोकांतिका मात्र मनातून काही दूर होईना. पण जमेल तितकया वेगात घर गाठून रजईत गुरफटून घेऊन झोपण्याचा विचार मनाला सुखावत होता. इतक्यात रस्त्याच्या कडेला तिरप्या झापेखाली चिकटून झोपलेली कुटुंबं दिसली. नदीच्या कडेला, गार वाऱ्याशी त्यांचं भांडण चालुये असा भास झाला. मग्रूर प्राक्तनाला दोष देण्याऐवजी जगण्याच्या चिवट बेदरकार इच्छेने थंडीशी त्यांचं जणू युद्ध चालू होतं. कुणी घर देईल का घर? - नटसम्राट...

'किमयागार' अर्णव, आईनस्टाईन आणि पृथ्वीचे वय!

१०व्या वाढदिवसाच्या दिवशी आमचे परमबंधू अर्णवशेट जायस्वाल आणि त्यांच्या कुतूहलास सप्रेम भेट... १६ डिसेंबर म्हणजे आमच्या मातोश्रींचा जन्मदिवस. बांग्लादेशची निर्मितीदेखील याच दिवशीची. काय योगायोग म्हणावा!  असो! नेहमीप्रमाणे मी प्रबोधिनीतून उशिराच घराकडे निघालो. काय सुबुद्धी सुचली आणि कधी नव्हे ते मी आधी फोन केला. आई आज्जीकडे होती. गाडीला टांग मारली आणि आम्हीही थेट पोहोचलो आमच्या मामाच्या किल्ल्यावर. तिथे आमच्या 'माईसाहेबांचे', म्हणजे आमच्या आज्जीचे राज्य चालते. गेलो ते थेट जेवणाच्या ताटावर बसलो तेव्हाच लक्षात आले कि शेवटच्या पंक्तीला फक्त आज्जी साथ द्यायला थांबलीये म्हणजे आपल्या पोटातली जागा आता ओढून ताणून का होईना मोठी करायला लागणार! त्यावर एक विस्तृत विवेचन लिहिता येईल. असो! जसा ताटावर बसलो तसा कुठून तरी आमचा अर्णव तिथे उपटला आणि मला बघताच टूणकन माझ्या मांडीवर येऊन बसला. अर्णव म्हणजे आमच्या धाकट्या मामासाहेब पेशव्यांचा थोरला बाजीराव. वय वर्षे १०! यत्ता ५वी'. पण डोळ्यावर 'अतीव अभ्यासूपणाचा' साक्षी पुरावा देणारा, एकसारखा नाकावरून खाली घसरणारा चष्मा आणि पेशव्यांना...

प्रज्ञेच्या जोपासनेसाठी हवे कोंदण!

ज्ञान प्रबोधिनीतर्फे सुरु करण्यात आलेल्या 'प्रज्ञावंतांचे शिक्षण: पद्धती आणि धोरणे' या नाविन्यपूर्ण पी.जी. डिप्लोमा अभ्यासक्रमाच्या निमित्ताने लिहिलेला लेख दैनिक सकाळने ५ ऑगस्ट २०१५ च्या संपादकीय पानावर छापला. भारतातील या विषयावरचा हा पहिलाच अभ्यासक्रम आहे. त्या निमित्ताने.. स र्व मुलांना समान शिक्षण देण्याच्या प्रयत्नात शाळांमधल्या तीक्ष्ण बुद्धीच्या मुलांचा वेगळा विचार सध्याच्या शिक्षणक्रमात ,  शिक्षण-पद्धतींमध्ये आणि शैक्षणिक धोरणात मागे पडला आहे. असामान्य बुद्धिमत्तेची मुले सर्वच समाजगटांमध्ये आढळून येतात. अगदी शाळांमध्ये आणि चहाच्या टपरीमध्ये सुद्धा. गावात आणि शहरात आणि अगदी आदिवासी पाड्यावर सुद्धा. अश्या मुलांमध्ये असामान्य स्मरणशक्ती, अद्भुत कल्पकता, अफलातून विनोदबुद्धी, उत्तम तार्किक शक्ती नजरेस येते. ‘काहीतरी वेगळीच चुणूक आहे’ असं आपण नकळत म्हणून जातो. परंतु अश्या वेगळ्या क्षमतांच्या मुलांचा विचार आपण शिक्षणव्यवस्थेत करतो आहोत का याबद्दल हा लेखनप्रपंच.   ‘प्रज्ञावंतांचे शिक्षण’ हा विषय आपल्या भारत देशात खूपच कमी प्रमाणात अभ्यासला गेला आहे. या विषयाबद्दल अन...

त्याच्या डोळ्यांतले प्रश्‍न...

परिस्थितीनं पोळलेली आणि शिक्षणापासून दूर राहिलेली ती मुलं होती. शिकण्यासाठी त्यांच्यामनात ऊर्मी दाटत होती; पण मार्गदर्शन आणि धीराचे चार शब्द हवे होते त्यांना भरारी घेण्यासाठी. .. सा धारण रात्री नऊची वेळ. शिवाजी मराठा शाळेसमोरच्या रस्त्यावर मी आणि आमच्या दलातील मुलं स्केटिंगचा सराव करत होतो. डिसेंबर महिन्यातील नुकतीच वाढू लागलेली थंडी आणि जानेवारीतल्या क्रीडा प्रात्यक्षिकातल्या सादरीकरणाची लगबग. अशातच एक मोठ्या डोळ्यांचा, थोडं पोट सुटलेला एका हाताने अर्धवट अपंग, डोळ्यात सुरमा लावलेला मुलगा लांबूनच आमच्याकडे टक लावून बघत होता. न राहवून थोड्या वेळांनी मीच त्याला विचारलं, "काय रे नाव काय तुझं?" "साबीर" त्याचं उत्तर आलं. त्याच्या त्या टपोऱ्या डोळ्यांमागची अस्वस्थ नजर ओळखून मी त्याला विचारले, "स्केटिंग शिकशील?" आणि तोही तितक्‍याच सहजपणे म्हणाला, "हॉं, हॉं, मुझे भी सिखाओगे?" आणि त्यानंतर तो आमच्यात सहजच आला. पुढे तो रोज येत राहिला आणि आमची ओळख वाढत गेली. साबीर शेजारच्याच बंगल्यात घरगडी म्हणून काम करतो. 17-18 वर्षे वय. चार वर्षांपूर्वी अभ्यास डोक्‍...