१०व्या वाढदिवसाच्या दिवशी आमचे परमबंधू अर्णवशेट जायस्वाल आणि त्यांच्या कुतूहलास सप्रेम भेट...
१६ डिसेंबर म्हणजे आमच्या मातोश्रींचा जन्मदिवस. बांग्लादेशची निर्मितीदेखील याच दिवशीची. काय योगायोग म्हणावा! असो! नेहमीप्रमाणे मी प्रबोधिनीतून उशिराच घराकडे निघालो. काय सुबुद्धी सुचली आणि कधी नव्हे ते मी आधी फोन केला. आई आज्जीकडे होती. गाडीला टांग मारली आणि आम्हीही थेट पोहोचलो आमच्या मामाच्या किल्ल्यावर. तिथे आमच्या 'माईसाहेबांचे', म्हणजे आमच्या आज्जीचे राज्य चालते. गेलो ते थेट जेवणाच्या ताटावर बसलो तेव्हाच लक्षात आले कि शेवटच्या पंक्तीला फक्त आज्जी साथ द्यायला थांबलीये म्हणजे आपल्या पोटातली जागा आता ओढून ताणून का होईना मोठी करायला लागणार!
त्यावर एक विस्तृत विवेचन लिहिता येईल. असो!
जसा ताटावर बसलो तसा कुठून तरी आमचा अर्णव तिथे उपटला आणि मला बघताच टूणकन माझ्या मांडीवर येऊन बसला. अर्णव म्हणजे आमच्या धाकट्या मामासाहेब पेशव्यांचा थोरला बाजीराव. वय वर्षे १०! यत्ता ५वी'. पण डोळ्यावर 'अतीव अभ्यासूपणाचा' साक्षी पुरावा देणारा, एकसारखा नाकावरून खाली घसरणारा चष्मा आणि पेशव्यांनाही लाजवेल अशी घेरदार ढेरी. महाराजांचे बूड एका जागेवर काही क्षण टिकेल तर शप्पत. गोंडस गोजिरवाणे रूप आणि तल्लख बुद्धी. त्यात आमच्या मामा-मामी साहेबांसारखे 'ऐटी' मधले जागरूक पालक! पोरगं जन्मापासूनच वाचायला, शिकायला लागलं. सगळा कारभार एकदम सुपरफाष्ट!
साहेबांची नुकतीच 'गणित प्राविण्य' ची परीक्षा झाली होती.
हुश्श म्हणेपर्यंत साहेबांचा पुढचा प्रश्न -
दादासाहेब चौकसे
बावधन, पुणे

'कशी गेली परीक्षा?' - इति दादासाहेब चौकसे (म्हणजे मीच!)साहेब झटकन उठले आणि आतून थेट पेपरच घेऊन आले.
'आकाशदादा, मला काही प्रश्न सुटले नाहीत. सांग ना.'रात्रीच्या १०.३० वाजता, जेवणाच्या टेबलवर, मातोश्रींच्या वाढदिवसाच्या ऐन गडबडीत, भावंडांच्या चेष्टा-मस्करीत आमचे गणित-प्रेम उतू जायला लागले तेव्हा आमच्या किल्लेदार माईसाहेबांचे तोंड बघण्यासारखे झाले होते. एखादा तरुण मुलगा स्कर्ट-झबलं घालून अचानक घरात शिरावा आणि 'कोणत्या ग्रहावरून आलंय येडं' असं म्हणत त्याच्याकडे कुत्सितपणे कटाक्ष टाकावा अशी तिची मुद्रा झाली होती.
'ई इक्वल टू एम सी स्क्वेअर काय असतं रे आकाशदादा' - इति अर्णव महाराजआता मात्र आजीकडे बघण्याचं धाडस होणं माझ्याच्याने शक्य नव्हते. डायलेमा का काय म्हणतात न तसलं काहीतरी झालं होतं. एक शिक्षक म्हणून विद्यार्थ्याने विचारलेला प्रश्न अनुत्तरीत ठेवायचा नाही हि 'मेडिकल' क्षेत्रात शपथ घालून घेतात त्याच धर्तीवर स्वतःला घालून घेतलेली आमची शपथ आणि दुसऱ्या बाजूला घरातील व्यक्तींच्या चेहऱ्यावरील 'आता हे काय चर्चा करणारेत!?' हे भाव. फार बाका प्रसंग! १० वर्षाच्या मुलाला थेट आईनस्टाईनची थेअरी सांगायची म्हणजे डबलच मोठा प्रसंग माझ्यावर गुदरला होता असं म्हणायला हरकत नाही. शब्दांची जुळवाजुळव केली आणि अर्णवची थोडक्यात जिज्ञासा भागवली.
हुश्श म्हणेपर्यंत साहेबांचा पुढचा प्रश्न -
'न्यूटनचा तिसरा नियम म्हणजे काय असतं?'संपूर्ण न्यूटन आणि आईन्स्टाईन आजच समजून पूर्ण करायचे; म्हणजे उद्यापासून थेट श्रोडिंजरचे मांजर आणि क्वांटम मेक्यानिक्स संपवायला मोकळे अश्या आविर्भावात अर्णवराव उभे आहेत कि काय असा मला भास झाला. परंतु, पुन्हा मला माझ्या शिक्षकी शपथेचे स्मरण झाले. मग मात्र मी अर्णवला उचलले आणि थेट मामाच्या ग्रंथालयात नेले. बरोब्बर शोधून मी अच्युतचे 'किमयागार' काढले आणि तो ठोकळा अर्णवरावांच्या हातात दिला.
'यात मिळेल तुला सगळं' - मी म्हणलो.मग काय! मी आणि अर्णवराव दोघे सोफ्यावर. घरातल्या लोकांच्या गर्दीपासून आणि पुलावाची रेसिपी, साडीची वेलबुट्टी, कोणाचे तरी लग्न, कोणती तरी कामवाली बाई इत्यादी अद्भुत महत्वाच्या चर्चांपासून लांब आलो. फाडफाड इंग्रजी माध्यमातून शिकणाऱ्या आमच्या बंधुराजांच्या वेगाने 'किमयागार' वाचण्याइतका संयम नसल्याने मीच हातात पुस्तक घेतले. अनुक्रमणिका उघडली आणि म्हणले,
'काय वाचायचं तुला बोल'
'पृथ्वीचे वय' - इति महाराज.मग आमची गाडी सुरु झाली. मी एक एक परिच्छेद वाचून-समजावून सांगायचा आणि अर्णवने त्यावर प्रश्न विचारायचे असा आमचा मस्त फड जमला होता. पुराण आणि बायबलमधल्या संदर्भांपासून सुरुवात करून हेली आणि रुदरफोर्ड पर्यंतचा प्रवास आम्ही एका तासात केला तेव्हा घड्याळात रात्रीचे १२ वाजले होते. ४५० कोटी वर्ष जुन्या असलेल्या पृथ्वीवर जेव्हा आम्ही भानावर आलो तेव्हा घरातले मगासचे चित्र पालटले होते. आमचे पितु:श्री कंटाळून झोपी गेल्याचे कळले. बहिणाबाई, मातोश्री आणि माईसाहेबांचे सर्व विषय बोलून संपले होते. मामीसाहेब परदेशातील ऑनलाईन मीटिंग मध्ये गेल्या होत्या आणि आमचे मामासाहेब आमच्याकडे कौतुकभरल्या नजरांनी बघत होते. आपले भले कशात आहे हे तत्काळ लक्षात घेऊन मी 'आता पुढची गोष्ट पुढच्या वेळी वाचूयात, बर का?!' असे म्हणून पटकन पुस्तक बंद केले.
दादासाहेब चौकसे
बावधन, पुणे

मस्त अाकाश . धन्य ते गुरु शिष्य !
ReplyDeleteअप्रतिम लेख
ReplyDeleteहाहा... मस्तच!
ReplyDelete