Skip to main content

Posts

Showing posts with the label Efforts

संवाद तरुणाईशी: रामन को मन की शक्ति देना

रात्रीचे साडे दहा वाजले असतील. अमेरिकन निवडणुकीचे निकाल बघायला टीव्ही समोर बसणार इतक्यात फोन वाजला. "हां बोल रे, रामन," मी नेहमीच्या उत्साहात सुरूवात केली. समोरून काहीच उत्तर आलं नाही. माझ्या मनात शंकेची पाल चुकचकली. काहीतरी गडबड झाली आहे याचा अंदाज आला. रामन 24-25 वर्षांचा अतिशय बुद्धिमान आणि कष्टाळू विद्यार्थी. ऐन कोरोनाच्या साथीत शिक्षण पूर्ण होऊन नोकरीच्या शोधात होता. नोकरी शोधायचे त्याचे पूर्ण प्रयत्न चालू होते पण यश येईना. "काय झालं?" मी काळजीने विचारलं. कसेबसे शब्द गोळा करून तो बोलायचा प्रयत्न करत होता, पण ते त्याला जड जात होतं. मला फक्त त्याचा हुंदका ऐकू आला.  "आय अॅम सॉरी," म्हणत रडू आवरायचा त्याने प्रयत्न केला, पण त्याला ते सगळं असह्य झालं होतं. तो मनमोकळेपणाने रडला. काही मिनिटं अशीच स्तब्ध गेली. हळूहळू तो बोलता झाला. गेले अनेक महीने घरी बसून असल्याने त्याचं दडपण रोज वाढत होतं. स्वतःच्या क्षमतांबद्दलचे प्रश्न मनात काहूर करत होते. त्यातच एका मैत्रिणीशी आज फोनवर बोलताना ती म्हणली, "अरे, इतर कितीतरी कमी deserving लोकांना नोकऱ्या मिळत आहेत. तुला...

बाकरवडी ते बरीटो - भाग ६: भारतातील शेवटचे गाव

बाकरवडी ते बरीटो लेखमाला लिहायला घेताना केवळ आपल्याशी मनमोकळा संवाद साधण्याचा प्रामाणिक हेतू मनात होता. भारतातील सर्वकाही तात्पुरता मागे सोडून पुढच्या शिक्षणासाठी अमेरिकेला येण्याचा हा प्रवास आपल्या सर्वांशी संवादाच्या माध्यमातून वाटून घेताना खूप मजा आली. लिहिता लिहिता स्वतःचा प्रवास पुन्हा जवळून बघायला मिळाला. त्या सर्व कटू-गोड आठवणी आपल्या सर्वांसोबत वाटून घेताना आपल्या अनेक बोलक्या प्रतिक्रिया आल्या. त्यातूनच लिहिण्याची उमेद वाढली. आपण भरभरून प्रतिसाद दिलात त्याबद्दल आभारी आहे. हा भाग ७० दिवसांच्या खंडानंतर लिहितोय. त्याबद्दल प्रथम माफी मागतो. जीआरईची परीक्षा आणि अर्जांची प्रक्रिया संपली. ७ नकार आणि २ होकार असे गणित समोर ठेवून मनाचा गुंता सोडवताना जरा दमछाक झाली. पर्ड्यू आणि कोलंबिया द्वंद्वाचा निकाल लावून पुण्यातला गाशा गुंडाळण्याची प्रक्रिया सुरु झाली. दरम्यान अरुणाचल प्रदेशचा एक दौरा झाला. तिथल्या विद्यार्थ्यांचा निरोप घेताना झालेली घालमेल आणि ब्रह्मपुत्रेचा परत फिरण्याचा आदेश घेऊन पुण्यात परतलो. अरुणाचल हा मनातला एक हळवा कोपरा परंतु त्याहूनही खोलवर रुजलेला आणि गेल्या २० वर्षा...

बाकरवडी ते बरीटो - भाग ४: दिल तो बच्चा है जी

आपल्याला कोलंबिया विद्यापीठाच्या टीचर्स कॉलेजमध्ये खरंच प्रवेश मिळाळा आहे याची पूर्ण खात्री झाल्यावर आणि त्याने बसलेल्या मानसिक धक्क्यातून सावरल्यावर दुसऱ्या दिवशी म्हणजे २३ फेब्रुवारीला मी माझ्या PhD चे मार्गदर्शक प्रा. बोर्लंड यांना पत्र लिहिलं. प्रज्ञावंतांच्या शिक्षणातील ते एक अतिशय विद्वान आणि जगप्रसिद्ध प्राध्यापक आहेत. गेल्या काही महिन्यांत आमच्यात जो पत्रव्यवहार झाला होता त्यातील त्यांच्या सूचनेवरूनच मी इकडे अर्ज पाठवण्याचं धाडस केलं होतं. "आपल्या मार्गदर्शनासाठी धन्यवाद. आता शिष्यवृत्तीच्या पत्राची प्रतीक्षा आहे.", मी त्यांना कळवले. PhD च्या शिक्षणासाठी अमेरिकी विद्यापीठांमध्ये संपूर्ण शिष्यवृत्ती मिळतेच या विश्वासाने मी पुढच्या नियोजनाला लागलो. आठवडाभरात विद्यापीठाचा निर्णय येईल याची खात्री होती म्हणून १५ मार्च उजाडला तरी अजून काहीच निर्णय न आल्याने मी थोडा अस्वस्थ व्हायला लागलो होतो. पुढच्या नियोजनाच्या अंतर्गत विनयने, खूप वर्षं बारगळलेल्या आमच्या एका रोडट्रीपची आठवण करून दिली आणि आम्ही, म्हणजे मी, बंड्या आणि विनयने 'आता कमी दिवस उरलेत बाबा' या अविर्भावा...

बाकरवडी ते बरीटो - भाग ३: 120th Street, New York

नोव्हेंबर महिन्यातली अर्जांची धावपळ एक डिसेंबरच्या रात्री थंडावली. Harvard, Berkeley, Stanford, Michigan, Wisconsin, आणि Vanderbilt अशा शिक्षण विषयातल्या सहा जगप्रसिद्ध आणि पहिल्या २० च्या यादीतल्या विद्यापीठांचे अर्ज भरून पाठवताना भरपूर दमछाक झाली. शेवटचे २-३ दिवस कामावरून सुट्टी घ्यावी लागलीच. अजून तीन ठिकाणचे अर्ज बाकी होते. त्यांच्या अंतिम तारखा १५ डिसेम्बर, ३० डिसेंबर आणि २ जानेवारी असल्याने मी पुन्हा निवांत झालो. शेवटच्या दिवशीपेक्षा अलीकडेच काम संपवले तर आपल्याकडून फाउल होईल आणि धारिणीला धूळ खात पडलेली अभियांत्रिकीची पदवी झोपेत येऊन आपल्याला शाप देईल या भीतीने ते तीनही अर्ज मी शेवटच्याच दिवशी भरले. उगीच रिस्क कशाला?! मी एकूण ९ अर्ज पाठवले. (म्हणजे लाखभर रुपयांचा चुराडा... जास्तच...असो) पैकी ७ ठिकाणी गणित शिक्षण या विषयात तर बाकी दोन ठिकाणी प्रज्ञावंतांचे शिक्षण या विषयात अर्ज केले. अजूनही PhD साठी शिकायला परदेशात जाण्याची मानसिक तयारी झालेलीच नव्हती. पुण्यात माझं निवांत चालू होतं. घरी राहायचं, हातात जेवणाचे आयते ५-६ डबे, कार्यालय मोजून ७ मिनिटांच्या अंतरावर, सगळे सहकारी वर्...

बाकरवडी ते बरीटो - भाग २: कोणी प्रवेश देईल का, प्रवेश?

जीआरीच्या अटकेतून पसार होऊन मी अरुणाचल गाठले. धावपळीने ग्रासलेल्या शहरी जीवनाशी फारसा संबंध न ठेवणाऱ्या डोंगराळ अरुणाचलात इतकी शांतता लाभण्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे माझ्या मोबाईलला नसलेली रेंज. बोंबलायला पुण्यातून एकही फोन नाही ओ! पहाटे पाचलाच उजाडणार. पण आपण सातला उठायचं, उपासना करायची, नाश्ता हाणला की थेट शिबिरात. संध्याकाळी मैदान, दल वगैरे संपवून रात्रीचं जेवण करून, पोरांशी गप्पा मारून थेट दहा वाजताच खोलीवर परत यायचं. त्यानंतर वीज पुरवठा बंद होणार. मेणबत्तीच्या प्रकाशात पुढच्या दिवशीचे नियोजन करेपर्यंत १२ वाजणार. मग कीर्र अंधारात उभ्या असलेल्या आपल्या खोलीबाहेर मस्त खुर्ची टाकून मोबाईलवर धृपद लावायचे आणि समोरच्या झाडीतल्या रातकिड्यांच्या साथीने त्या अभंग समाधीचा अद्भुत अनुभव घ्यायचा..आत्मिक सुख..दुसरं काय! अरुणाचलहून पुरेशी आत्मिक विश्रांती घेऊन परत आल्यावर सुरु झाली विद्यापीठांना अर्ज करण्याची लगबग. बहुतेक ठिकाणी एक डिसेम्बरच्या आतच अर्ज करायचे होते. त्यासाठी रोज विद्यापीठांची माहिती वाचा, त्यातले आपले आवडते विभाग शोधा, त्या ठिकाणी काम करणारे प्राध्यापक शोधा, त्या ५०-६० प्राध्...

बाकरवडी ते बरीटो - भाग १: माझे जीआरीपुराण

गेल्या वर्षी ५ सप्टेंबरला बाप्पाचं विसर्जन झालं. अंगात जितकी ताकद होती तितकी सगळी लावून रात्रीची मिरवणूक वाजवली. बहुतेक हीच आपली पुण्यातली शेवटची मिरवणूक ठरणार अशी शंका मनात होती. त्यामुळे सुरुवातीलाच कमरेला बांधलेला ताशा शेवटपर्यंत काही मी सोडला नाही. वाद्यांची आवराआवर संपवून घरी येऊन झोपलो ते थेट दुसऱ्या रात्री जेवायलाच उठलो. PhD ला कुठेतरी भारताबाहेर प्रवेश घेण्याचा विचार त्याआधी वर्षभर मनात रेंगाळत होता पण त्यासाठी लागणारी तयारी करायला मुहूर्त लागत नव्हता. बाप्पाचं विसर्जन झालं की तयारी सुरु करायची असं काहीसं ठरवलेलं. तर, ६ सप्टेंबरच्या मध्यरात्री GRE च्या परीक्षेची माहिती वाचायला घेतली. ETS ची वेबसाईट, काही ब्लॉग्स वगैरे वाचून काढले. काय काय तयारी करायला लागते हे नोंदवायला घेतलं. दुसऱ्या बाजूला हार्वर्ड, कोलंबिया वगैरे विद्यापीठांच्या संकेतस्थळांवर जाऊन माहिती वाचायला घेतली. उगाचच मोठालं अवाढव्य स्वप्नरंजन सुरु झालं.  आणि काही क्षणांमध्येच भानावर आलो - GRE ची तारीख! २ ऑक्टोबरला अरुणाचल प्रदेशला जायचं नियोजन आधीच ठरलेलं आणि ते रद्द करण्याचा व्याभिचारी विचार मनाला शिवणं शक्यच...

त्याच्या डोळ्यांतले प्रश्‍न...

परिस्थितीनं पोळलेली आणि शिक्षणापासून दूर राहिलेली ती मुलं होती. शिकण्यासाठी त्यांच्यामनात ऊर्मी दाटत होती; पण मार्गदर्शन आणि धीराचे चार शब्द हवे होते त्यांना भरारी घेण्यासाठी. .. सा धारण रात्री नऊची वेळ. शिवाजी मराठा शाळेसमोरच्या रस्त्यावर मी आणि आमच्या दलातील मुलं स्केटिंगचा सराव करत होतो. डिसेंबर महिन्यातील नुकतीच वाढू लागलेली थंडी आणि जानेवारीतल्या क्रीडा प्रात्यक्षिकातल्या सादरीकरणाची लगबग. अशातच एक मोठ्या डोळ्यांचा, थोडं पोट सुटलेला एका हाताने अर्धवट अपंग, डोळ्यात सुरमा लावलेला मुलगा लांबूनच आमच्याकडे टक लावून बघत होता. न राहवून थोड्या वेळांनी मीच त्याला विचारलं, "काय रे नाव काय तुझं?" "साबीर" त्याचं उत्तर आलं. त्याच्या त्या टपोऱ्या डोळ्यांमागची अस्वस्थ नजर ओळखून मी त्याला विचारले, "स्केटिंग शिकशील?" आणि तोही तितक्‍याच सहजपणे म्हणाला, "हॉं, हॉं, मुझे भी सिखाओगे?" आणि त्यानंतर तो आमच्यात सहजच आला. पुढे तो रोज येत राहिला आणि आमची ओळख वाढत गेली. साबीर शेजारच्याच बंगल्यात घरगडी म्हणून काम करतो. 17-18 वर्षे वय. चार वर्षांपूर्वी अभ्यास डोक्‍...