Skip to main content

Posts

Showing posts with the label Gifted Education

संवाद तरुणाईशी: रामन को मन की शक्ति देना

रात्रीचे साडे दहा वाजले असतील. अमेरिकन निवडणुकीचे निकाल बघायला टीव्ही समोर बसणार इतक्यात फोन वाजला. "हां बोल रे, रामन," मी नेहमीच्या उत्साहात सुरूवात केली. समोरून काहीच उत्तर आलं नाही. माझ्या मनात शंकेची पाल चुकचकली. काहीतरी गडबड झाली आहे याचा अंदाज आला. रामन 24-25 वर्षांचा अतिशय बुद्धिमान आणि कष्टाळू विद्यार्थी. ऐन कोरोनाच्या साथीत शिक्षण पूर्ण होऊन नोकरीच्या शोधात होता. नोकरी शोधायचे त्याचे पूर्ण प्रयत्न चालू होते पण यश येईना. "काय झालं?" मी काळजीने विचारलं. कसेबसे शब्द गोळा करून तो बोलायचा प्रयत्न करत होता, पण ते त्याला जड जात होतं. मला फक्त त्याचा हुंदका ऐकू आला.  "आय अॅम सॉरी," म्हणत रडू आवरायचा त्याने प्रयत्न केला, पण त्याला ते सगळं असह्य झालं होतं. तो मनमोकळेपणाने रडला. काही मिनिटं अशीच स्तब्ध गेली. हळूहळू तो बोलता झाला. गेले अनेक महीने घरी बसून असल्याने त्याचं दडपण रोज वाढत होतं. स्वतःच्या क्षमतांबद्दलचे प्रश्न मनात काहूर करत होते. त्यातच एका मैत्रिणीशी आज फोनवर बोलताना ती म्हणली, "अरे, इतर कितीतरी कमी deserving लोकांना नोकऱ्या मिळत आहेत. तुला...

बाकरवडी ते बरीटो - भाग ४: दिल तो बच्चा है जी

आपल्याला कोलंबिया विद्यापीठाच्या टीचर्स कॉलेजमध्ये खरंच प्रवेश मिळाळा आहे याची पूर्ण खात्री झाल्यावर आणि त्याने बसलेल्या मानसिक धक्क्यातून सावरल्यावर दुसऱ्या दिवशी म्हणजे २३ फेब्रुवारीला मी माझ्या PhD चे मार्गदर्शक प्रा. बोर्लंड यांना पत्र लिहिलं. प्रज्ञावंतांच्या शिक्षणातील ते एक अतिशय विद्वान आणि जगप्रसिद्ध प्राध्यापक आहेत. गेल्या काही महिन्यांत आमच्यात जो पत्रव्यवहार झाला होता त्यातील त्यांच्या सूचनेवरूनच मी इकडे अर्ज पाठवण्याचं धाडस केलं होतं. "आपल्या मार्गदर्शनासाठी धन्यवाद. आता शिष्यवृत्तीच्या पत्राची प्रतीक्षा आहे.", मी त्यांना कळवले. PhD च्या शिक्षणासाठी अमेरिकी विद्यापीठांमध्ये संपूर्ण शिष्यवृत्ती मिळतेच या विश्वासाने मी पुढच्या नियोजनाला लागलो. आठवडाभरात विद्यापीठाचा निर्णय येईल याची खात्री होती म्हणून १५ मार्च उजाडला तरी अजून काहीच निर्णय न आल्याने मी थोडा अस्वस्थ व्हायला लागलो होतो. पुढच्या नियोजनाच्या अंतर्गत विनयने, खूप वर्षं बारगळलेल्या आमच्या एका रोडट्रीपची आठवण करून दिली आणि आम्ही, म्हणजे मी, बंड्या आणि विनयने 'आता कमी दिवस उरलेत बाबा' या अविर्भावा...

बाकरवडी ते बरीटो - भाग ३: 120th Street, New York

नोव्हेंबर महिन्यातली अर्जांची धावपळ एक डिसेंबरच्या रात्री थंडावली. Harvard, Berkeley, Stanford, Michigan, Wisconsin, आणि Vanderbilt अशा शिक्षण विषयातल्या सहा जगप्रसिद्ध आणि पहिल्या २० च्या यादीतल्या विद्यापीठांचे अर्ज भरून पाठवताना भरपूर दमछाक झाली. शेवटचे २-३ दिवस कामावरून सुट्टी घ्यावी लागलीच. अजून तीन ठिकाणचे अर्ज बाकी होते. त्यांच्या अंतिम तारखा १५ डिसेम्बर, ३० डिसेंबर आणि २ जानेवारी असल्याने मी पुन्हा निवांत झालो. शेवटच्या दिवशीपेक्षा अलीकडेच काम संपवले तर आपल्याकडून फाउल होईल आणि धारिणीला धूळ खात पडलेली अभियांत्रिकीची पदवी झोपेत येऊन आपल्याला शाप देईल या भीतीने ते तीनही अर्ज मी शेवटच्याच दिवशी भरले. उगीच रिस्क कशाला?! मी एकूण ९ अर्ज पाठवले. (म्हणजे लाखभर रुपयांचा चुराडा... जास्तच...असो) पैकी ७ ठिकाणी गणित शिक्षण या विषयात तर बाकी दोन ठिकाणी प्रज्ञावंतांचे शिक्षण या विषयात अर्ज केले. अजूनही PhD साठी शिकायला परदेशात जाण्याची मानसिक तयारी झालेलीच नव्हती. पुण्यात माझं निवांत चालू होतं. घरी राहायचं, हातात जेवणाचे आयते ५-६ डबे, कार्यालय मोजून ७ मिनिटांच्या अंतरावर, सगळे सहकारी वर्...

आठवण..

एखाद्या कल्पनेने आपण भारावून जातो. त्याबद्दलचे मनोरे रचायला लागतो. कधीतरी अचानक ठरवून टाकतो त्या कल्पनेला मूर्त रूप द्यायचे. आणि मग लगबग सुरु होते. सोहळा उभा राहतो आणि सोहळा संपन्न होतो. धावपळ शमते तशी मागे वळून पाहताना मन रेंगाळते समाधानाच्या क्षणांपाशी. दमलेले शरीर बोलू लागते स्वतःशीच. आणि विश्रांतीचा विचार मनात येताच आठवण होते संकल्पाची...आठवण.. आठवण थकलेले डोळे दोन झोपताना म्हणती .. सुट्टी घेऊ उद्या आता स्वप्नांमध्ये फिरती /१/ दमलेले पाय दोन गादीवरी पडती.. प्रवासाला पुढच्या न्या नवे कुणी सोबती /२/ वाकलेली पाठ एक घेऊ म्हणे विश्रांती.. दम घेते थोडा आता जाऊ उद्या संगती /३/ गुंगलेले मन माझे समाधानी रमती.. देऊनिया साक्ष त्याची आनंदक्षण गणती /४/ लगबग मती मग आठवण करती.. उठूनिया उद्या पुन्हा लावायची पणती /५/ बब्बू संवर्धन प्रज्ञेचे 18.2.2017

प्रज्ञेच्या जोपासनेसाठी हवे कोंदण!

ज्ञान प्रबोधिनीतर्फे सुरु करण्यात आलेल्या 'प्रज्ञावंतांचे शिक्षण: पद्धती आणि धोरणे' या नाविन्यपूर्ण पी.जी. डिप्लोमा अभ्यासक्रमाच्या निमित्ताने लिहिलेला लेख दैनिक सकाळने ५ ऑगस्ट २०१५ च्या संपादकीय पानावर छापला. भारतातील या विषयावरचा हा पहिलाच अभ्यासक्रम आहे. त्या निमित्ताने.. स र्व मुलांना समान शिक्षण देण्याच्या प्रयत्नात शाळांमधल्या तीक्ष्ण बुद्धीच्या मुलांचा वेगळा विचार सध्याच्या शिक्षणक्रमात ,  शिक्षण-पद्धतींमध्ये आणि शैक्षणिक धोरणात मागे पडला आहे. असामान्य बुद्धिमत्तेची मुले सर्वच समाजगटांमध्ये आढळून येतात. अगदी शाळांमध्ये आणि चहाच्या टपरीमध्ये सुद्धा. गावात आणि शहरात आणि अगदी आदिवासी पाड्यावर सुद्धा. अश्या मुलांमध्ये असामान्य स्मरणशक्ती, अद्भुत कल्पकता, अफलातून विनोदबुद्धी, उत्तम तार्किक शक्ती नजरेस येते. ‘काहीतरी वेगळीच चुणूक आहे’ असं आपण नकळत म्हणून जातो. परंतु अश्या वेगळ्या क्षमतांच्या मुलांचा विचार आपण शिक्षणव्यवस्थेत करतो आहोत का याबद्दल हा लेखनप्रपंच.   ‘प्रज्ञावंतांचे शिक्षण’ हा विषय आपल्या भारत देशात खूपच कमी प्रमाणात अभ्यासला गेला आहे. या विषयाबद्दल अन...