(आयुष्याचा खरा अर्थ समजावून सांगणाऱ्या अनुभवामधून जन्मलेली कविता…)
छताकडे डोळे लावून
आतमध्ये
थरथरत होता 'तो'...
टिकटिक संपण्याची वाट बघत
घंटेकडे डोळे लावून
मंदिराबाहेर
थिजली होती 'ती'...
कौल येण्याची वाट बघत
घड्याळाकडे डोळे लावून
दरवाज्याबाहेर
बसला होता 'चित्रगुप्त'...
ड्युटी संपण्याची वाट बघत
बसून राहिली तशीच
रेंगाळत
न सरकता 'वेळ'...
पाट फुटण्याची वाट बघत
मारत राहिले लाथा
अथक
चिवट खेळात 'चौघेही'
'दुसरे' थकण्याची वाट बघत!
बब्बू
छताकडे डोळे लावून
आतमध्ये
थरथरत होता 'तो'...
टिकटिक संपण्याची वाट बघत
घंटेकडे डोळे लावून
मंदिराबाहेर
थिजली होती 'ती'...
कौल येण्याची वाट बघत
घड्याळाकडे डोळे लावून
दरवाज्याबाहेर
बसला होता 'चित्रगुप्त'...
ड्युटी संपण्याची वाट बघत
बसून राहिली तशीच
रेंगाळत
न सरकता 'वेळ'...
पाट फुटण्याची वाट बघत
मारत राहिले लाथा
अथक
चिवट खेळात 'चौघेही'
'दुसरे' थकण्याची वाट बघत!
बब्बू
Comments
Post a Comment