वेळ रात्री 1 ची. 'नटसम्राट' बघून सुन्न डोक्याने 'मंगला' मधून बाहेर पडलो. चांगलीच थंडी होती.
'To be or not to be' म्हणत स्वतःच्या अस्तित्वाबद्दलच प्रश्न विचारणारा नटसम्राट, स्वतःच्या कर्तृत्वावर कमावलेल्या माजावर काळाने केलेली मात पाहून उध्वस्त झालेला नटसम्राट, प्रचंड प्रेम केलेल्या पोटच्या पोरांकडून अपमानित झालेला रंगभूमीचा दुभंगलेला नटसम्राट!
कधी मुजोर, कधी हळवा, कधी निखळ, कधी लाचार भासणाऱ्या नटसम्राटाने डोक्यात वादळ उभं केलं होतं. त्याच अवस्थेत बाईक सुरु केली आणि बाहेर पडलो.
महापालिकेसमोरच्या मुख्य रस्त्याला लागेपर्यंत थंडीने शरीराचा ताबा घेतला होता. नटसम्राटाची शोकांतिका मात्र मनातून काही दूर होईना. पण जमेल तितकया वेगात घर गाठून रजईत गुरफटून घेऊन झोपण्याचा विचार मनाला सुखावत होता.
इतक्यात रस्त्याच्या कडेला तिरप्या झापेखाली चिकटून झोपलेली कुटुंबं दिसली. नदीच्या कडेला, गार वाऱ्याशी त्यांचं भांडण चालुये असा भास झाला. मग्रूर प्राक्तनाला दोष देण्याऐवजी जगण्याच्या चिवट बेदरकार इच्छेने थंडीशी त्यांचं जणू युद्ध चालू होतं.
आणि वाटू लागली लाज मलाच माझ्या उबदार रजईची, ढुंगणाखालच्या गाडीची, खिशातल्या तिकिटांची, स्वतःच्या 'आहे रे' पणाची. आणि स्वतःच्या निष्क्रिय, निगरगट्ट बेफिकिरीची!
बब्बू

कुणी घर देईल का घर? - नटसम्राट गणपत बेलवलकराचे शब्द मनाच्या कानात तापत्या लावा रसासारखे शिरले.
आणि वाटू लागली लाज मलाच माझ्या उबदार रजईची, ढुंगणाखालच्या गाडीची, खिशातल्या तिकिटांची, स्वतःच्या 'आहे रे' पणाची. आणि स्वतःच्या निष्क्रिय, निगरगट्ट बेफिकिरीची!
बब्बू

वाह! अत्यंत महत्वाचा आणि गंभीर मुद्दा नेमक्या पद्धतीने मांडलाय. समाजातलं जळजळीत आणि भयावह वास्तव कधीच सुखावह पद्धतीने समोर येत नाही; येऊही नये. नेमक्या शब्दांत मार्मिक व प्रभावी मांडणी.
ReplyDeleteजाता जाता - लेखावरचा 'नटसम्राट' मधल्या स्वगतांचा स्पष्ट प्रभाव लपत नाही. ;)
Kamaal! _/\_
ReplyDeleteSundar! Asach lihit raha!
ReplyDeleteFarach bhari.....
ReplyDeleteछान लिहिलंयस, वाईट वाटत विचार करून... पण यावर उपाय काय ?

ReplyDelete