ठाण्याच्या अलीकडे गाड्यांची ही प्रचंड गर्दी. विमानतळावर जाण्यापूर्वी ठाण्याच्या मामाला भेटायचं आणि मग रवाना व्हायचं, असं ठरलं होतं. पण ही गर्दी बघता विमान चुकतंय का काय अशी भीती वाटायला लागली होती. त्यातच शेजारच्या धसमुसळ्या चालकाने आमची गाडी घासली आणि आरश्याचा चुराडा झाला. गाडीतला ताण हळूहळू वाढत चालला होता...अस्वस्थ करणारी शांतता पसरली होती...त्यातही वातावरण हलकंफुलकं ठेवण्याचे प्रयत्न आईकडून चालूच होते!
ठाण्याला पोचलो तेव्हा घराच्या बाहेरच पवईचा अनुप भेटला. अनेक तास वाट बघून कंटाळला होता बिचारा. खरगपूरहून रत्नदीप येऊ शकणार नव्हता. अनुप, रत्नदीप, सौरभ, पुष्कर म्हणजे गेल्या दोन-तीन वर्षातले सर्वात जवळचे साथीदार. त्यांनी मिळून एक भेटवस्तू आणली होती. ती देण्यासाठी रात्रीच्या अपप्रहारी अनुप ठाण्याच्या अनोळखी गल्लीत वाट बघत उभा होता.
मामाचा निरोप घेऊन विमानतळावर पोचलो. छत्रपती शिवाजी महाराज विमानतळाचा तो रुबाबच अजब! अनेक मित्रांनी माझ्याआधी यापूर्वी तिथून जड निरोप घेतला होता. त्या सर्वांच्या मनात भावनांची काय गर्दी त्या क्षणी झाली असेल याचा अनुभव मी घेत होतो. भव्य कमानींच्या प्रवेशदवाराच्या समोरच भल्यामोठ्या खांबावर राष्ट्रध्वज फडकताना दिसत असतो. त्या दृष्याच्या पडद्यासमोर आपल्या सर्वात जवळच्या व्यक्ती निरोपासाठी जमलेल्या असतात. शब्दांच्याशिवाय संवाद चालू असतो. अस्वस्थ शांतता मोडण्यासाठी कुणीतरी उगीचच शब्दांशी चाळा करतो. शेवटी कुठेतरी विराम घेऊन दरवाज्यातून आत जावं लागतं. आईच्या घट्ट मिठीचा स्पर्श, बाबांनी मुका घेताना गालावर पडलेला एक कढत अश्रू, भांडभांड भांडलेल्या बहिणीच्या पाणावलेल्या कडा...आणि आपलं जड झालेलं पाऊल...
बोर्डिंगची वाट बघत असताना अनुपने दिलेल्या वस्तूची आठवण झाली. अलगदपणे बॉक्स उघडला तेव्हा त्यातून एक वस्तू आणि चौघांची पत्रं निघाली. आजवर भावना व्यक्त करण्यात कायमच माती खात आलेल्या पोरांनी त्या पत्रांमधून मला साफ खोटं ठरवलं. मराठीतून लिहिण्याचा त्यांचा संघर्ष त्यात दिसतच होता, पण अतिशय आपुलकीने लिहिलेल्या त्या पत्रांना प्रेमाचा सुगंधी दरवळ होता...कायम हवाहवासा वाटणारा...
मुंबईतून विमानाने उड्डाण केलं तेव्हा मनावर एकच कविता रेंगाळली होती. 'तव अधिक शक्ती उद्धरणी मी..येईन त्वरे कथुनि सोडिले तिजला..सागरा..' खिडकीतून दिसणारी मुंबापुरीची ती झगमगती रात्र हळूहळू छोटीछोटी होत जाऊन ढगांच्या पडद्यामागे विरून गेली.
शिकागोच्या उंचचउंच इमारतींची टोकं दिसायला लागली तशी अटलांटिक समुद्राची आणि पंचतलावांची कंटाळवाणी विमानझेप संपण्याची चिन्हं दिसू लागली. इमिग्रेशनच्या भल्यामोठ्या रांगेत तासभर उभं राहून अमेरिकी सुरक्षाअधिकाऱ्याशी भेट झाली. कागदपत्रं तपासून झाल्यावर आपली करडी नजर वर करून तो मला म्हणला, "अमेरिकेत तुमचे स्वागत आहे. तुमचा दिवस चांगला जावो."
तोपर्यंत प्रबोधिनीतला मित्र आणि सावरकर दलावरचा सख्खा साथीदार प्रणव विमानतळाबाहेर येऊन थांबला होता. शिकागोपासून ३ तासांवर असलेल्या स्वतःच्या ऑफिसमधून गाडी चालवत तो मला न्यायला आला होता. पुढचे तीन तास गाडी चालवत तो मला पर्ड्यूला सोडणार होता, आणि रात्रीतच पुन्हा तीन तास निर्मनुष्य रस्त्यावरून एकट्याने गाडी मारत तो पुन्हा त्याच्या गावी जाणार होता. हे असं हक्काने प्रेम करणारी अनेक माणसं मला आयुष्यात मिळाली म्हणून माझ्यासारखा नशीबवान मीच!
मक्याच्या शेतीच्या भकास रस्त्यावरून प्रवास करत आम्ही मध्यरात्री ११ वाजता पर्ड्यूला पोचलो. पर्ड्यू ही एक छोटीशी विद्यापीठनगरी आहे याचा गाडीतच अंदाज आला होता. कुठेही वाहतूक नाही, वर्दळ नाही, पथदिवे नाहीत..रात्रीच्या शांततेत नगर गाढ झोपलं होतं.. पुढे तीन दिवस माझा मुक्काम उत्तराकडे असणार होता. प्रबोधिनीचीच विद्यार्थिनी असलेली उत्तरा आता पर्ड्यूला शिकत होती. तिच्या घरातल्या बाहेरच्या सोफ्यावर माझी रवानगी झाली. तीन प्रबोधक एकत्र आल्यावर साहजिक प्रबोधिनीच्या गप्पा झाल्या. त्घायानंतर घाईघाईने प्रणव बाहेर पडला..पुढच्या निर्मनुष्य प्रवासासाठी...
सकाळी उठून उत्तरासोबत विद्यापीठात गेलो. सुंदर हिरवळीची गालिचे, त्या भोवती रचलेल्या जुन्या, बुटक्या दगडी इमारती, विद्यार्थ्यांची वर्दळ, आणि नव्या शैक्षणिक वर्षाच्या ताजेपणानं भारलेलं वातावरण! दुपारच्या जेवणाला भेटायचे ठरवून आमच्या वाटा वेगळ्या झाल्या. बँकेत खाते उघडून एका मेक्सिकन रेस्तराँला आम्ही भेटलो. "काय खाणार?" या प्रश्नाला माझ्याकडे अर्थातच काही उत्तर नव्हतं. बाहेर जेवायला गेल्यावर चायनीज, पंजाबी, आणि सीफूडच्या पलीकडचं जग मला माहितच नव्हतं. "बरीटो घे. पोटभर होईल." "ठीके, एक चिकन बरीटो", "नाही, कोणताही भात घाला." "चालेल, कोणतेही बीन्स टाका." "कोणतंही चीज घाला." नव्या अनुभवाला मी सज्ज झालो होतो.
ताटातला तो बरीटो माझ्याशी काहीतरी बोलतोय, मला काहीतरी खुणावतोय असा भास मला झाला. "नवीन विश्वात तुझं स्वागत आहे." अनोळखी जगातल्या नवीन बब्बूचा पहिला साथीदार म्हणजे हा ताटातला बरीटो. भविष्याच्या पोटात काय दडलंय हे तर मला माहीत नव्हतं..पण आजवर बाकरवडीत वाढलेला बब्बू आता बरीटोच्या साक्षीने एक नवीन सुरूवात करू पहात होता. पुढच्या अनेक मजेशीर घडामोडींमध्ये तो माझा पक्का दोस्त होणार होता. बब्बू आणि बरीटोची मैत्री रंगणार हे मात्र नक्की झालं होतं! (समाप्त)
बब्बू
९ डिसेंबर २०१९
अबुधाबी
भाग २
भाग ३
भाग ४
भाग ५
भाग ६
भाग ७
भाग ८
भाग ९

अपत्रिम
ReplyDelete