Welcome, Sir! हसऱ्या चेहऱ्यानं आमचं राणीपूर गावात स्वागत झालं. दुपारचे चार वाजले होते. आमच्या गाडीची वाट पहाट ६ स्थानिक तरुण-तरुणी रस्त्याच्या कडेला उभे होते. जंगल सफारी तर पुढच्या दिवशीपासून सुरू होणार होती. मग इथं नेमकं काय बघायला आलोय याची उत्सुकता लागली होती. "Walk with the Pardhis" अशा नावाचा कार्यक्रम इथे होणार होता इतकंच माहीत होतं. पारधी समाज हा पारंपारिक दृष्ट्या शिकारीवर अवलंबून असलेला भटका समाज. इतर समाजाने काहीसा वाळीत टाकलेला, गुन्हेगार ठरवून टाकलेला समाज. गावात कोणताही गुन्हा घडला की पहिले पारधी वस्तीवर अटक होणार हे आपल्या समाजातलं करूण वास्तव. "ज्याच्या हाती ससा तो पारधी" अशी म्हणच जिथे रुळली आहे तिथे पारध्याच्या नशिबी "आधी अटक मग चौकशी" हाच न्याय येणार. त्यात नवल ते काय! 😢 आपण आता जंगल कसं बघायचं हे शिकणार आहोत, बीरेन दादाने सांगितलं. आम्ही त्यांच्या पाठोपाठ चालायला सुरूवात केली. "हे आवळ्याचं झाड," "हे खैराचं झाड. पानात कथ्था लावतात ना ते हेच," असं सांगत सांगत त्यांनी आम्हाला एका खड्ड्यापाशी थांबवलं. "हे बघा, हे ...