कधी तरी...मध्यंतरी..
हरवला होतास कुठे तरी..
दिसलं तुला नवं क्षितीज..
डोळ्यात तुझ्या दिसली वीज..
घेऊन भरारी पसरलेस पंख..
उडून गेलास उंचच उंच..
हृदयात तेव्हा आली कळ..
मारून उडी गाठला तळ..
आठवणींचे उघडून कप्पे..
सांगत राहिलो 'मत ले दिल पे'
विश्वास होता भेटशील पुन्हा..
तुझा काही नव्हताच गुन्हा..
निश्चय जेव्हा 'गाठीन आकाश'
म्हणायचं नसतं 'अरे! सावकाश'
सुटली जरी जमीन तरी..
नाळ काही तुटत नाही..
मोजली कितीही उत्तुंग शिखरं..
खोलवर मनात घरचीच पाखरं..
जुन्या मैत्रीचं हेच तर 'राज'
'जुनाच तू' मला भेटलास आज ...
बब्बू
२५.५.१६
तुझं लिखाण खूपच सुंदर आहे रे दादा. दर वेळी मनाला भिडून जातं. (y)
ReplyDeleteधन्यवाद करण.. (Y)
Delete