आला वैशाख वणवा
तरी चैत नाही आला
लई तापली जमीन
तळ आत्ताच गाठला
माझा शेतकरी बाप
केलं नाही त्यानी पाप
पाणी नाही जमिनीला
धार लागली डोळ्याला
परी आभाळ फाटलं
तरी आभाळ फुटंना
पुरे झाली आता थट्टा
कौल लावला देवाला
अरे विठ्ठला विठ्ठला
दाव थोडी दया माया
गुरं सैराट सोडूनी
येऊ कसा भेटायाला?
घोषणांचा नाय तंटा
मदतीचा तोरा मोठा
माझा छोटा साभिमान
इकू का रं सावकारा?
नको नको भगवंता
उपकार नको आता
तुझ्या गाभाऱ्यात उभा
उभ्या जगाचा पोशिंदा!
बब्बू
पुणे
२ एप्रिल २०१६
तरी चैत नाही आला
लई तापली जमीन
तळ आत्ताच गाठला
माझा शेतकरी बाप
केलं नाही त्यानी पाप
पाणी नाही जमिनीला
धार लागली डोळ्याला
परी आभाळ फाटलं
तरी आभाळ फुटंना
पुरे झाली आता थट्टा
कौल लावला देवाला
अरे विठ्ठला विठ्ठला
दाव थोडी दया माया
गुरं सैराट सोडूनी
येऊ कसा भेटायाला?
घोषणांचा नाय तंटा
मदतीचा तोरा मोठा
माझा छोटा साभिमान
इकू का रं सावकारा?
नको नको भगवंता
उपकार नको आता
तुझ्या गाभाऱ्यात उभा
उभ्या जगाचा पोशिंदा!
बब्बू
पुणे
२ एप्रिल २०१६

अप्रतीम ... भयाण वास्तव 😢
ReplyDeletespeechless...
ReplyDeletePan tarihi, "निष्क्रियता माझी, स्वप्निल थोर आहे!"
अप्रतीम
ReplyDelete