गेल्या काही महिन्यांपासून आजूबाजूच्या घटना आणि सामान्य समाजाचे वर्तन पाहून मनात येणाऱ्या अस्फुट विचारांना आज कवितेची वाट मिळाली..माझी बहुतेक पहिलीच कविता! प्रतीक काही बोलायचे आहे पण बोलणार नाही समशेर उपसली होती पण मारणार नाही आसवे डोळ्यामधली मी गाळणार नाही मित्राच्या खांद्यावरती मस्तक टेकणार नाही मी नाही विकल, नाही मी अस्वस्थ निष्क्रिय मी केवळ, गर्दीचे प्रतीक फुकाची ती वाफ, तरल तो आक्रोश विरून ही जातो, झुंडीत मी पोटाच्या दाण्यांसाठी, दृष्टी आड सृष्टी सत्य नेमके काय, याचा ठाव नाही वेडा की रे तो, जो नाचतो बेभान विसावणार तो ही, चार निमिशांत मग कशा हवी फुकाची, ती धावपळ निष्क्रियता माझी, स्वप्निल थोर आहे! बब्बू पुणे 12 मार्च 16